तुम्हाला लघु उद्योगासाठी लोन हवे असल्यास तुमच्याकडे आधार असणे अनिवार्य असते. तुम्ही आधारसाठी अर्ज केला आहे, पण एनरोलमेंट क्रमांक किंवा त्याच्याशी संबंधित मोबाइल क्रमांक विसरला असाल तर एका सोप्या पद्धतीने तुम्हाला आधार डाऊनलोड करता येतो.
तुम्ही एनरोलमेंट क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा अगदी आधार क्रमांक पण विसरला असाल तरीही यूआयडीएआय यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून अगदी आरामात आधार कार्ड डाऊनलोड करता येते. शासकीय आधार संकेतस्थळाने ती प्रक्रिया अगदी सोपी केली आहे. तुमच्याकडे फक्त रजिस्टर्ड ईमेल आयडी असायला पाहिजे.
आधार कार्ड डेटा कधीही कोणालाही सांगू नका. यूआयडीएआय यांच्या अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही संकेतस्थळावर हा डेटा प्रविष्ट करू नका.
मोबाइल क्रमांक किंवा एनरोलमेंट क्रमांक नसताना आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करण्याची प्रक्रिया:
टप्पा १
मोबाइल क्रमांक नसताना आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी – प्रथम एनरोलमेंट क्रमांक मिळवा
-
पुढील लिंकला भेट द्या https://resident.uidai.net.in/find-uid-eid किंवा इथे क्लिक करा
-
एनरोलमेंट क्रमांक (ईआयडी) निवडा
-
अर्ज करताना दिलेले तुमचे पूर्ण नाव आणि ईमेल आयडी (मोबाइल क्रमांक प्रविष्ट करायची आवश्यकता नाही) प्रविष्ट करा.
-
सेक्युरिटी कोड प्रविष्ट करा, आणि “गेट ओटीपी” क्लिक करा.
-
तुमच्या ईमेल आयडी वर तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल.
-
ओटीपी प्रविष्ट करा आणि “वेरीफाय ओटीपी” क्लिक करा.
-
तुम्हाला एनरोलमेंट क्रमांक असलेली ईमेल प्राप्त होईल.
टप्पा २
मोबाइल क्रमांक नसताना आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करणे:
तुम्हाला ईमेलमध्ये एनरोलमेंट क्रमांक प्राप्त झाला असेल, आता पुढील लिंकला भेट द्या: https://eaadhaar.uidai.gov.in/ किंवा इथे क्लिक करा
खालील सोप्या पद्धतीचे पालन करा –
-
एनरोलमेंट आयडी निवडा (आधीच्या टप्प्यात मिळालेला)
-
आवश्यक तपशील प्रविष्ट करा
-
‘मोबाइल नंबर’ रकान्यात तुम्ही सध्या वापरत असलेला मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा.
-
‘गेट वन टाइम पासवर्ड’ क्लिक करा, आणि तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल.
- ओटीपी प्रविष्ट करा, वॅलिडेट करा आणि डाऊनलोड करा.
एनरोलमेंट क्रमांक नसताना आधार कार्ड कसा डाऊनलोड करावा?
तुम्ही यापूर्वी पाहिले की रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक असल्यास प्रक्रिया सोपी होते कारण ओटीपी त्या क्रमांकावर पाठवला जातो.
-
एनरोलमेंट क्रमांक नसताना आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी वरील टप्प्यांची मदत घेऊ शकता. एनरोलमेंट क्रमांक मिळवण्यासाठी इथे क्लिक करा
-
इ-आधार डाऊनलोड संकेतस्थळासाठी या लिंकला भेट द्या.
-
एनरोलमेंट क्रमांक आणि रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा आणि आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करा.
आधार क्रमांक, एनरोलमेंट क्रमांक, रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक आणि रजिस्टर्ड ईमेल आयडी या पैकी तुमच्याकडे कोणतीही माहिती नसेल तर जवळच्या आधार कार्ड केंद्राला भेट द्या.
खालील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:
-
मोबाइल क्रमांक आणि एनरोलमेंट क्रमांक नसताना आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी – नेहेमी एनरोलमेंट क्रमांक आधी मिळवा, नंतर आधार क्रमांक मिळवा! कारण आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी तुम्ही कोणताही मोबाइल क्रमांक देऊ शकता. तुम्ही आधार क्रमांक मिळवला तर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक द्यावा लागेल.
-
इ-आधार कार्डला पासवर्ड असतो. तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे आणि जन्म वर्ष एकत्र करून पासवर्ड निर्माण होतो.
-
आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी वरील प्रक्रियेचे पालन करा. एकदा डाऊनलोड झाले की मग तुम्ही त्याचे प्रिंट घेऊ शकता.
बिझनेस लोन हवे आहे? ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा. ग्रोमोर आकर्षक व्याज दरावर तारण न ठेवता लघु उद्योगांना बिझनेस लोन देते.