लघु उद्योग लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी लोनच्या व्याज दरावर परिणाम करणार्या खालील घटकांबाबत जाणून घ्या!
- विविध प्रकारचे कर्जदार: बँक, एनबीएफसी व इतर लोन देणार्या संस्था विविध व्याज दर आकारतात.
- क्रेडिट स्कोअर: उद्योजकाचा क्रेडिट स्कोर उत्तम असेल तर कर्जदार व्याज दर कमी करू शकतात.
- व्यवसायाचा प्रकार: काही उद्योग क्षेत्रात इतरांपेक्षा अधिक जोखीम असते. उद्योग क्षेत्र विचारात घेऊनच कर्जदार व्याज दर ठरवतात.
- आर्थिक स्वास्थ्य: व्याज दर निश्चित करताना व्यवसाय किती काळापासून सुरू आहे व त्याचे आर्थिक स्वास्थ्य (जे बॅलेन्स शीट, पी&एल (नफा-तोटा) लेख, कॅश फ्लो स्टेटमेंट, इत्यादी वरुन लक्षात येते) याचा पण विचार केला जातो.
- गहाण ठेवलेली संपत्ती/कोलॅटरल: लोन देताना कर्जदाराने संपत्ती गहाण ठेवली आहे किंवा नाही यावर देखील व्याज दर अवलंबून असतो.
तुम्ही या सगळ्या घटकांचा विचार केला असेल आणि लघु उद्योग लोन कुठून घ्यावे हा विचार करत असाल तर आजच ग्रोमोर फायनॅन्सशी संपर्क साधा!