प्रत्येक उद्योगाला वाढ करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. साधन किंवा मशीन विकत घेण्यासाठी, अनुभवी कर्मचार्यांची नेमणूक करण्यासाठी, दुसर्या ठिकाणी ऑफिस उघडण्यासाठी, वर्किंग कॅपिटल इत्यादीसाठी निधीची आवश्यकता असते.
सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे लघु उद्योग लोनसाठी अर्ज करणे. लघु उद्योजक बँक किंवा एनबीएफसी कडून बिझनेस लोन घेऊ शकतो. बँक साधारणपणे तारण ठेवून लोन देतात, त्यापेक्षा चांगला पर्याय म्हणजे लघु उद्योजकाने एनबीएफसी कडून विनातारण लोन घ्यावे.
वेगवेगळ्या लोन देणार्या कंपन्यांचे वेगवेगळे पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे असतात. तुमचा उद्योग कोणत्या प्रकारचा आहे यावर पण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे अवलंबून असते. प्रायवेट लिमिटेड कंपनी, भागीदारीत कंपनी, स्वयंरोजगारित व्यावसायिक व गैर–व्यावसायिक सगळ्यांसाठी वेगवेगळी कागदपत्रे आवश्यक असतात.
नेमकी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात हे पाहण्यापूर्वी आपण व्यवसायाचे विविध प्रकार पाहू:
लघु उद्योगांचे विविध प्रकार समजून घेऊ
प्रायवेट लिमिटेड कंपनी
- प्रायवेट लिमिटेड कंपनी म्हणजे खाजगी लघु उद्योग ज्यात मालकाची जबाबदारी त्याच्याकडे असलेल्या शेअरच्या मूल्यावर अवलंबून असते.
- कमाल ५० शेअर होल्डर असू शकतात.
- एखाद्या शेअर होल्डरला आपले शेअर विकायचे/हस्तांतरित करायचे असतील तर त्याने प्रथम इतर शेअर होल्डरना विचारणे अनिवार्य असते.
- शेअर होल्डर आपले शेअर सामान्य जनतेला देऊ/विकू शकत नाही.
मालकी हक्क असलेला व्यवसाय
- अशा प्रकारच्या उद्योगात व्यवसायाच्या नफ्यासाठी किंवा तोट्यासाठी फक्त मालक जबाबदार असतो.
- इतर कोणत्याही बाह्य पक्षाची ढवळाढवळ नसते.
- उत्पन्नावर आयकर मालकाच्या नावाने भरल्या जातो.
- एका विशिष्ट पातळीपेक्षा कमी उत्पन्न असल्यास अशा प्रकारच्या उद्योगाला ऑडिट करण्याची आवश्यकता नसते.
भागीदारी व्यवसाय
- भागीदारी व्यवसायात दोन किंवा अधिक व्यक्ती करारावर सही करतात आणि सह–मालक या नात्याने व्यवसाय चालवण्याचे ठरवतात.
- कंपनीची थकबाकी रक्कम देण्यासाठी कंपनीची मालमत्ता पुरेशी नसेल तर भागीदारांची खाजगी मालमत्ता वापरली जाते.
- कोणत्याही भागीदाराला आपला भाग इतरांना हस्तांतरित करायचा असेल तर त्यापूर्वी इतर भागीदारांची परवानगी काढणे अनिवार्य आहे.
- व्यवसायातील धोक्याचे वाटप पण सर्व भागीदारांमध्ये एकसारखे केले जाते.
- मालकी हक्क असलेल्या व्यवसायाच्या तुलनेत भागीदारी व्यवसायाला कमी कर भरावा लागतो.
- एका भागीदाराने घेतलेल्या निर्णयाचा प्रभाव संपूर्ण व्यवसायावर होतो. म्हणून एका भागीदाराने चूक केली तर इतर भागीदार पण प्रभावित होतात.
स्वयं–रोजगारित व्यावसायिक आणि स्वयं–रोजगारित गैर–व्यावसायिक
- स्वयं–रोजगारित व्यावसायिक हे उद्योजक असतात जे फ्रीलांसर म्हणून काम करतात. ते त्यांच्या खर्चावर आणि स्वतः धोका पत्करून काम करतात.
- स्वयं–रोजगारित गैर–व्यावसायिक म्हणजे दुकानदार, हस्तकला विकणारे इ. ते त्यांच्या व्यवसायात पैसे गुंतवतात किंवा बिझनेस लोन घेतात.
- आता आपल्याला विविध प्रकारचे लघु उद्योग कोणते हे कळले. आता प्रत्येक प्रकारासाठी लोन घेताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात ते पाहू.
लघु उद्योग लोन घेण्यासाठी सर्वसाधारणपणे लागणारी कागदपत्रे
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मागील १२ महिन्याची बँकेची अकाऊंट स्टेटमेंट (पीडीएफ रूपात)
- मागील २ वर्षाचे आयकर रिटर्न
- शेवटची बॅलेन्स शीट आणि पी&एल (तात्पुरते)
- शेवटची ऑडिट केलेली बॅलेन्स शीट आणि पी&एल
- गुमास्ता/दुकान आस्थापना परवाना
- जीएसटी रजिस्ट्रेशन पावती
- जीएसटी पावती/ चलन
- इनकार्पोरेशन प्रमाणपत्र
- आर्टिकल ऑफ असोसिएशन (एओए)
- भागीदारी व्यवसाय असल्यास भागीदारी करार
स्वयं–रोजगारित व्यावसायिक आणि मालकी हक्क व्यवसायांसाठी आवश्यक कागदपत्रे:
- मालकी हक्क असलेल्या व्यक्तीचे ओळखपत्र (मालकी हक्क असलेल्या व्यक्ती किंवा स्वयं–रोजगारित व्यक्तींसाठी)
- कंपनीच्या नावाने असलेले आयकर रिटर्न, पालिका कर पावती, पाणी/विजेची पावती
- मालकाचे ओळखपत्र (पासपोर्ट, ड्रायवर लायसेंस, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड)
- मालकाच्या पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, ड्रायवर लायसेंस, मतदार ओळखपत्र)
स्वयं–रोजगारित गैर–व्यवसायिकांसाठी आवश्यक कागदपत्रे:
- व्यक्तीचे ओळखपत्र
- आयकर रिटर्न (३ वर्षाचे)
- नियतकालिक स्टॉक, कर्ज आणि कर्ज देणार्या कंपन्यांचे स्टेटमेंट (मागील तीन महिने)
- मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
प्रायवेट लिमिटेड कंपनी किंवा भागीदारी व्यवसायासाठी आवश्यक कागदपत्रे:
प्रायवेट लिमिटेड कंपनीचे ओळखपत्र (जीएसटी, आयकर रिटर्न, पाणी/विजेचे बिल, पॅन कार्ड, व्यवसायाच्या नावाचे नगरपालिकेचे कर बिल, मेमोरॅनडम आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन)
अधिकृत हस्ताक्षरकर्त्यांचे ओळख पत्र, आणि मॅनेजिंग डायरेक्टर सह अजून एक डायरेक्टर यांचे पॅन कार्ड, मतदार कार्ड, किंवा पासपोर्ट.
लघु उद्योगाच्या प्रकारावर कोणती कागदपत्रे आवश्यक असतात हे अवलंबून असते. बिझनेस लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी कर्ज देणार्या कंपनीचे पात्रता निकष आणि कागदपत्रांची यादी तपासून पहा. असे केल्याने तुम्हाला लवकर बिझनेस लोन मिळू शकते.
तुमच्या लघु उद्योगासाठी तुम्हाला लोन हवे असल्यास, वाजवी व्याज दरावर त्वरित लोन देणार्या ग्रोमोर फायनॅन्स कंपनीशी संपर्क साधा!