तुम्ही महिला उद्योजिका असाल तर कधीकधी कुटुंबाचा आधार न मिळाल्यामुळे व्यवसाय चालवणे कठीण होते. दुसरी मुख्य समस्या म्हणजे व्यवसाय कार्यक्षमपणे चालवण्यासाठी निधी शोधणे. सुरुवातीच्या काळात कुटुंबीय, मित्र, व्हेंचर कॅपिटल यांच्याकडून निधी घेता येतो किंवा स्वतःची बचत वापरता येते. भारतातील महिला उद्योजिकांसाठी बँकेला किंवा एनबीएफसी यांना लोनसाठी संपर्क करणे, किंवा मुद्रा योजना सारख्या सरकारी योजनांचा लाभ घेणे हे पण पर्याय उपलब्ध असतात.
बिझनेस लोन मिळवण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध असतात:
१. मित्र आणि कुटुंबीय
काही महिला उद्योजिका सुरुवातीच्या काळात आपल्या मित्रांकडून किंवा कुटुंबीयांकडून आर्थिक मदत घेतात. अशाने परतफेड करण्याचे आणि इतर लोनसाठी असलेले उच्च व्याज दर देण्याचे ओझे कमी होते.
२. व्हेंचर कॅपिटल
व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणजे अशी व्यक्ती किंवा कंपनी जी स्टार्ट अप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते, व मोबदल्यात या गुंतवणुकीवर काही परतावा मिळेल आणि स्टार्टअपच्या धोरणात्मक नियोजनात भाग घेता येईल याची अपेक्षा करते. निधी उभा करण्यासाठी, विशेषकरून महिलांसाठी हा विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो.
काही व्हेंचर कॅपिटलिस्ट महिला उद्योजिकांपेक्षा पुरुष उद्योजकांना आर्थिक मदत देणे पसंत करतात, पण तरीही काही व्हेंचर कॅपिटलिस्ट महिलांना मदत करण्यासाठी सदैव तयार असतात. साहा फंड सारखे उपक्रम महिला उद्योजिकांच्या उद्योगांना आर्थिक मदत करतात.
३. वैयक्तिक बचत
काही महिलांना भविष्यात लोन घ्यावे लागेल, किंवा उच्च व्याज दर भरावे लागतील किंवा त्यांचा व्यवसाय अयशस्वी होईल अशी भीती वाटत असते, म्हणून व्यवसाय सुरु करताना त्या स्वतःच्या बचतीतील पैसे वापरात. दुसरे कारण म्हणजे बहुसंख्य महिलांच्या नावाने मालमत्ता नसते आणि म्हणून बँकेकडे लोन मागणे अवघड होते, कारण भविष्यात व्यवसाय अयशस्वी झाला तर लोनची परतफेड करणे अवघड होते.
४. बँक
भारतातील काही बँक महिला उद्यजिकांसाठी विशेष बिझनेस लोन देतात. काय तारण ठेवता येते, व्याज दर इत्यादी बाबत त्यांच्या अटी आणि शर्ती लवचिक असतात.
काही बँकांमध्ये उपलब्ध असलेल्या योजना खाली दिल्या आहेत:
श्री शक्ती पॅकेज
ज्या महिला सरकारने चालवलेल्या उद्योजिका विकास कार्यक्रमात (इ.डी.पी.) सहभागी होतात आणि ज्यांचा व्यवसायात ५०% हक्क असतो त्यांच्यासाठी एसबीआय यांनी योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार लोनची रक्कम दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर व्याजदरात ०.५०% सूट दिली जाते.
देना शक्ती योजना
देना बँकेची ही योजना कृषी, उत्पादन, किरकोळ विक्री, लघु उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजिकांसाठी आहे.
या योजनेनुसार किरकोळ विक्री उद्योगात लोनची कमाल रक्कम वीस लाख रुपये असते आणि व्याजदरात ०. २५% सूट दिली जाते.
सेंट कल्याणी योजना
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या योजने अंतर्गत गावात कुटीर उद्योग, सूक्ष्म, लघु, किंवा मध्यम उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या महिला ज्या स्वयंरोजगारित आहेत, कृषी क्षेत्रात आहेत किंवा कोणत्याही सरकार प्रायोजित कार्यक्रमाचा भाग म्हणून करतात त्यांना लोन दिले जाते. या योजनेनुसार, काहीही तारण ठेवावे लागत नाही, आणि कोणतीही प्रोसेसिंग फीस नसते. लोनची कमाल रक्कम एक कोटी रुपये असू शकते.
५. एन बी एफ सी
नॉन बँकिंग फिनान्शियल कंपन्या विना तारण लोन देतात. त्यांची अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असते आणि अगदी कमी संख्येत कागदपत्र आवश्यक असतात. यांच्या अटी व शर्ती पण लवचिक असतात. बँकेकडून लोन घेतल्यास लोनची रक्कम परत मिळवण्यासाठी बँकेला तुमची मालमत्ता जप्त करून विकता येते पण एनबीएफसी तसे करू शकत नाही.
६. मुद्रा योजना
मुद्रा योजना म्हणजेच सूक्ष्म उद्योग विकास आणि रीफिनान्स एजेन्सी लिमिटेड. ही योजना सर्व सूक्ष्म व लघु उद्योगांच्या विकासासाठी वापरता येते. या अंतर्गत, तीन उपयोजना आहेत ज्या व्यवसायाच्या विकासाच्या विविध टप्प्यात आवश्यक असणाऱ्या निधीसाठी वापरता येतात.
त्या खालील प्रमाणे आहेत:
- शिशु (पन्नास हजार रुपयांपर्यंत)
- किशोर (पन्नास हजार पासून पाच लाख रुपयांपर्यंत)
- तरुण (पाच लाख पासून दहा लाख रुपयांपर्यंत)
बँक, एनबीएफसी, मुद्रा योजना यासाठी पात्रता निकष कोणते हे आपण पाहू
बँक आणि एनबीएफसी यांच्याकडून लोन घेण्यासाठी कोणते पात्रता निकष असतात हे आपण पाहू:
१. वय
अर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे व लोनचा अवधी संपेल त्या दिवशी ६५ पेक्षा अधिक नसावे.
मुद्रा योजनेसाठी अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष असावे.
२. व्यवसायाचे टर्न ओव्हर
टर्नओव्हर किंवा वार्षिक उलाढाल म्हणजे व्यवसाय किती कमी अवधीत रोख गोळा करू शकतो. उद्योगाची वार्षिक उलाढाल रु १५ लाख ते रु १ कोटी यामध्ये असली पाहिजे.
३. व्यवसायाचे वय
लोनसाठी पात्र असायला उद्योग किती वर्ष सुरू आहे हा पण एक निकष असतो. व्यवसाय किमान ३ वर्षापासून सुरू असावा, मात्र, काही लोन देणार्या कंपन्या मागील १ वर्षापासून कार्यरत असलेल्या उद्योगांना पण लोन देतात.
४. क्रेडिट स्कोर
बँक असो किंवा एनबीएफसी, बिझनेस लोन घेताना क्रेडिट स्कोर हा सगळ्यात महत्वाचा निकष असतो.
क्रेडिट स्कोर आणि क्रेडिट हिस्टरी वरून तुमची लोन परतफेड करण्याची क्षमता आणि पूर्वीचा लोन फेडण्याचा इतिहास कळतो.
७५० – ९०० यामधील स्कोर चांगला आहे असे मानले जाते, पण हे प्रत्येक कंपनीसाठी वेगवेगळे असू शकते. वरील निकषाव्यतिरिक्त मुद्रा लोन घेण्यासाठी तुमचा कोणता व्यवसाय आहे हे पण सांगावे लागते. खालीलपैकी एका प्रकारचा व्यवसाय असू शकतो :
- दुकानदार
- मधमाश्या पाळणे, मत्स्यपालन, कृषी-प्रक्रिया उद्योग इ
- फळ आणि भाजी विक्रेता
- कापड आणि हस्तकला उद्योग
- खाद्य पदार्थ
- सलून, औषधाची दुकाने, कुरियर इ सेवा
बिझनेस लोनसाठी आवश्यक कागदपत्रे:
- ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा (मालकाचे आधार आणि पॅन कार्ड)
- मागच्या १२ महिन्याचे बँक स्टेटमेंट (पीडीएफ रूपात)
- मागच्या २- वर्षाचे आयकर रिटर्न (व्यवसायाचे आणि वैयक्तिक)
- नवीनतम बॅलेन्स शीट आणि पी&एल
- व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक परवाने आणि परवानग्या
- जी एस टी रेजिस्ट्रेशन पावती आणि चलन
मुद्रा लोनसाठी खाली नमूद कागदपत्रे पण आवश्यक असतात:
- वीज किंवा पाण्याचे बिल
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- व्यवसाय मालक/भागीदाराचे फोटो
- भागीदारी करार
तुम्ही महिला उद्योजिका असाल आणि तुमच्या व्यवसायासाठी त्वरित विना तारण लोन हवे असेल तर वाजवी व्याज दरावर लोन मिळवण्यासाठी ग्रोमोर फायनान्स कंपनीशी संपर्क साधा!