कुठल्याही लघु उद्योगासाठी, अंतिम ध्येय असते वाढ आणि प्रगती. मात्र ध्येय गाठायचा मार्ग कठीण असतो आणि आपल्यापैकी काही लोकांसाठी तो अधिकच अवघड असतो…
चला भेटू श्री उलझ ह्यांना…
श्री उलझ मागच्या काही वर्षांपासून एक लघु उद्योग चालवतात. मात्र मागील काही महिन्यात अनेक समस्या त्यांच्यापुढे उभ्या राहिल्या आहेत…त्यांच्या इनवेंटरीचा खर्च वाढला आहे, आणि रोख रकमेचे व्यवस्थापन एक डोकेदुखी होऊन बसली आहे.
परिणामत: त्यांना आपल्या ग्राहकांशी संपर्क करणे अवघड झाले आहे!
उद्योगात इतरही समस्या आहेतच, जसे पर्याप्त कर्मचारी नसणे… अकाऊंटिंगचे सॉफ्टवेअर नवीन आणणे… बदलत्या कर कायद्यांप्रमाणे अभिलेख ठेवणे… स्पर्धक कंपन्यांच्या एक पाऊल पुढे राहणे… त्यांना काळजी वाटते की रोख रकमेची कमतरता आणि व्यवसायाचे आर्थिक व्यवहार ह्यासाठी त्यांना लवकर उपाय सापडले नाही… तर त्यांना उद्योग बंद करावा लागेल!
सुदैवाने श्री उलझ ह्यांचे एक चांगला मित्र आहेत जे त्यांना मदत करू शकतात! चला भेटू श्री सुलझ ह्यांना…
श्री सुलझ आणि श्री उलझ ह्यांनी आपले उद्योग जवळजवळ एकाच वेळी सुरू केले. श्री सुलझ ह्यांचा व्यवसाय वेगाने वाढत आहे.
त्यांना “जस्ट इन टाइम” इनवेंटरी व्यवस्थापन आणि खर्च नियंत्रण ह्याचे महत्त्व आणि ते कसे करावे हे माहिती आहे.
श्री सुलझ इतर लघु उद्योजकांना नियमितपणे भेटून त्यांच्याकडून कामाच्या सर्वोत्तम पद्धती शिकतात. त्यांनी नुकतेच नवीन POS प्रणाली बसवून घेतली आणि आता नवीन ग्राहक कसे आकर्षित करायचे ह्याचा विचार ते करीत आहेत. त्यांच्या कर्मचार्यांनी नेहेमीच काही तरी नवीन शिकत राहावे आणि स्वत:चे कौशल्य वाढवत राहावे असा त्यांचा प्रयत्न असतो.
रोख रकमेच्या व्यवस्थापनात त्यांना काही समस्या येत नाही – त्यांनी योग्य पद्धतीने आर्थिक नियोजन केले आहे आणि त्यांच्याकडे आकस्मिक परिस्थितीसाठी नेहेमीच व्यवस्था असते!
श्री सुलझ आता श्री उलझ ह्यांच्या एक एक समस्येचा विचार करून त्यांना मदत करत आहेत. ग्राहकांच्या मागणीचा अंदाज कसा लावावा हे सांगून श्री उलझ ह्यांच्या इनवेंटरी संबंधी समस्या त्यांनी दूर केल्या. योग्य कर्मचारी कसे निवडावे आणि मोठे खर्च शक्य तितक्या पुढे कसे ढकलता येतात हे त्यांनी श्री उलझ ह्यांना सांगितले. एवढेच नाही… श्री उलझ ह्यांचा व्यवसाय मार्गावर यावा म्हणून सर्वोत्तम सॉफ्टवेअर कुठले वापरता येईल ह्याची यादी पण श्री सुलझ ह्यांनी दिली!
श्री सुलझ ह्यांना विश्वास आहे की लवकरच श्री उलझ ह्यांच्या सर्व समस्या दूर होतील!
श्री सुलझ सारखेच ग्रोमोर फायनॅन्स पण लघु उद्योगांना त्यांच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते, ज्यामुळे आर्थिक अडचणींवर मात करता येते आणि उपलब्ध संधींचा फायदा घेता येतो!
सल्ला देणारे आणि मदत करणारे श्री सुलझ सारखे मित्र सगळ्यांनाच लाभतात असे नाही!
श्री उलझ सारखी तुमची परिस्थिती असेल तर ग्रोमोर फायनॅन्स ह्यांना संपर्क करा! आम्ही लघु उद्योगांना त्यांच्या विकासात मदत करतो!