इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिसपॉन्स टीम (सर्ट-इन) यांच्या मते २०१७ साली भारतात ऑनलाइन फ्रॉडच्या ५३००० केस झाल्या. ऑनलाइन व्यवहारामुळे आपले जीवन खूप सोपे झाले असले तरी ऑनलाइन असताना सावधान असणे आवश्यक असते.
ऑनलाइन फ्रॉडपासून सावध राहण्याचे काही मार्ग खाली दिले आहेत
ऑनलाइन फ्रॉडपासून सावध राहण्याचे मार्ग!
- संशयास्पद ईमेल व अटॅचमेंट उघडणे टाळा. ते फिशिंग ईमेल असू शकतात.
- फिशिंग म्हणजे तुमच्याकडून पासवर्ड व क्रेडिट कार्ड सारखी खाजगी माहिती मिळविण्यासाठी फसवे ईमेल पाठविले जातात.
- पासवर्डमध्ये अक्षर आणि अंक दोन्ही वापरा.
- ओळखण्यास सोपे असलेले पासवर्ड ठेऊ नका, जसे १२३४५, ००००, ९९९९ अथवा abc१२३४५.
- इंटरनेट बँकिंग यूजर आयडी व पासवर्ड कधीही कुणालाही देऊ नका.
- डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डचे पिन, सीवीवी व ओटीपी कुणालाही देऊ नका.
- काही लोक तुम्हाला फोन करून तुमच्या बँकेमधून किंवा आरबीआयमधून बोलत असल्याचे सांगून तुमचा बँक अकाऊंट क्रमांक, एटीएम पिन इत्यादी मागतात. अशा लोकांना कधीही उत्तर देऊ नका.
- तुमच्या कार्डवर काही पॉईंट्स असून तुम्हाला ट्रान्सफर करत असल्याचे सांगितले तरीही असे फोन उचलू नका.
- अशा फोनमुळे फसवणूक होते. बँक व आरबीआय कधीही असे फोन करून माहिती मागत नाही अथवा पॉइंट ट्रान्सफर करत नाही
- कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक अथवा ओपन वायफाय नेटवर्कचा वापर करू नका, विशेषतः ऑनलाइन बँकिंगसाठी.
- कम्प्युटरवरील अॅंटीवायरस सॉफ्टवेअर अपडेट केलेला असावा.
- कुठून तरी डाऊनलोड करण्यापेक्षा हे सॉफ्टवेअर विकत घेतलेलेच उत्तम.
- इतर सोशल मीडिया अकाऊंट, ईमेलचे पासवर्ड आणि इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड वेगळे निवडा.
- सोशल मीडिया प्रायवसी सेटिंगमध्ये तुमची माहिती फक्त मित्रांनाच दिसेल असे सेटिंग करा.
- आधार कार्ड नंबर अथवा जन्मतारीख अनोळखी माणसांना देऊ नका.
- कोणत्याही कागद्पत्राची कॉपी देताना ते कशासाठी वापरले जाणार आहे याचा उल्लेख करा.